BTS 275 Binary द्वंद्व : 0 - 1 1⃣

*0⃣ Binary द्वंद्व : 0 - 1 1⃣*

तुका म्हणे होय मनासी संवाद । 
आपुलाची वाद आपल्यासी ॥ 😇

✅ ना समाजाशी, ना पुस्तकांशी, ना वेळेशी; स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात आपला सगळ्यात मोठा झगडा असतो स्वतःशी, सतत टोचणाऱ्या Self-doubt शी. 
Aspirant (0) ते अधिकारी (1), हा जगासाठीचा Binary प्रवास आपल्याला मात्र आपल्या मनाशी झगडा करीत Analog पद्धतीने कणाकणाने पार करायचा असतो, प्रत्येक दिवशी. 🤼

✅ हातात कोणतीच पोस्ट नसणारे आपण बहुतांश जगासाठी कर्तव्यशून्य असतो. पण आपल्या मनात मात्र आपल्याला बरोबर याच्या विरुद्ध प्रतिमा धुगधुगत ठेवायची असते, साशंकतेच्या सोसाट्याच्या वाऱ्यात विश्वासाची पणती जपावी तशी. 🌀

✅ हे अंतर्मनातील द्वंद्व थकवणारं असतं. पण तरीही पुढे पुढेच चालत राहायचं असतं. पायाच्या पोटरीत आलेल्या पेटक्यांना विसरून शिखराकडे नजर ठेवून पुढचं पाऊल टाकणाऱ्या गिर्यारोहकासारखं. ⛰

✅ आणि एक दिवस Result ची ती एक pdf file आणि त्यात असलेलं तुमचं नाव सगळं काही पलटून टाकते, एका क्षणात. 
पोस्ट हातात नसणारे तुम्ही (म्हणजे 0) ते अधिकारी (म्हणजे 1) हा Binary प्रवास तुम्ही कणाकणाने झिजून पार केलेला असतो, पण जगासाठी तो प्रवास त्या निकालाच्या एका क्षणात काटला जातो. म्हणून तुमच्यापेक्षा इतरांसाठी तो जास्त आश्चर्याचा धक्का असतो, तो तसाच राहू द्यावा. 🏆

✅ तुमच्या यशाचा हा तेजोमय दिवस नक्की येईल. फक्त तशा आत्मविश्वासाची पणती स्टडी रूमच्या/घरातील/ऑफिसमधील तुमच्या छोट्याश्या कोपऱ्यात तेवत ठेवा, बाहेर कितीही घोंगावणारी वादळे आली तरी! 🪔

तुम्हां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 🎇


https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t


परमाणु टेस्ट सिरीज ॲप


Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries

Download App for Mock Test

पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030

#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study

Comments

Popular posts from this blog

*करेंट अफेयर्स : 20 मार्च 2025*

करेंट अफेयर्स : 19 मार्च 2025*

*करेंट अफेयर्स : 24 मार्च 2025*