महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2024 PTS NO 1
➡️ *महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2024 जाहीर*
◾️महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देण्याचा उद्देश
◾️आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सांस्कृतिक वारसा आणि कला यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करणे, सांस्कृतिक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संशोधन विकासास प्रोत्साहन देणे ही या धोरणाची उद्दिष्टे
◾️दर पाच वर्षांनी धोरणाचा आढावा घेण्यात येणार
➖
➡️ *लोहगाव विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे' नामकरण*
◾️या निर्णयानुसार नामकरणाची शिफारस केंद्र शासनास पाठवली जाणार आहे
➖
➡️ शिरूर ते छत्रपती संभाजीनगर 14 हजार 886 कोटींच्या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास मंजूरी
➡️ बार्टी संस्थेतील नियमाप्रमाणेच कायम नोंदणी झालेल्या सारथीच्या 724 व महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्ती देण्यास मान्यता
➡️ क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रे येथील भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आला
➡️ अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीसाठी सहज पदे उपलब्ध होतील, या साठी धोरणात सुधारणा करण्यास मान्यता
➖
➡️ *राज्यातील 14 आयटीआय संस्थांचे नामकरण*
◾️औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीडचे नाव :कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड,
◾️औ.प्र.संस्था जामखेड जि. अहमदनगरचे नाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
◾️औ.प्र. संस्था मुंबई शहरचे नाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
◾️औ.प्र. संस्था येवला जि. नाशिकचे नाव : महात्मा ज्योतिबा फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
◾️ औ.प्र. संस्था जव्हार जि. पालघरचे नाव : भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
◾️औ.प्र.संस्था कोल्हापूरचे नाव : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
◾️औ.प्र.संस्था अमरावतीचे नाव : संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
◾️औ.प्र. संस्था सांगलीचे नाव : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
◾️औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांवचे नाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
◾️औ.प्र. संस्था आर्वी जि. वर्धाचे नाव : दत्तोपंतजी ठेंगडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
◾️औ.प्र.संस्था बेलापूर नवी मुंबईचे नाव : दि. बा. पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
◾️औ.प्र. संस्था कुर्लाचे नाव : महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
◾️औ.प्र. संस्था भूम जि. धाराशिवचे नाव : आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
◾️ औ.प्र. ठाणे चे नाव : धर्मवीर आनंद दिघे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे होणार आहे.
➖
➡️ *ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ*
◾️या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक-युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येईल
◾️या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येईल
◾️महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे राहील
➖
➡️ *राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ*
◾️या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक-युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येईल
◾️या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येईल
◾️महामंडळाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे राहील
➖
➡️ *राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी केले*
◾️नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी (एस १४) वीस वर्षांच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहायक गटविकास अधिकारी (एस १५) व तीस वर्षांनंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी (एस २०) असा मिळेल.
➡️ *राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ*
◾️सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार ६ हजार, ८ हजार आणि १० हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. तर उपसरपंचांना २ हजार, ३ हजार आणि ४ हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. सध्या सरपंचांना ३ हजार, ४ हजार आणि ५ हजार रुपये इतके मानधन मिळते. तर उपसरपंचांना १ हजार, दिड हजार आणि २ हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळते. राज्यात २७ हजार ९४३ ग्रामपंचयाती आहे.
#Update
परमाणु टेस्ट सिरीज ॲप
Contact - 9420033363
https://linktr.ee/parmanutestseries
Download App for Mock Test
पत्ता :- परमाणु टेस्ट सिरीज ॲप ऑफिस , टिळक स्मारक मंदिराशेजरी सदाशिव पेठ , पुणे - 411030
#PoliceBharti #MPSCExams #FreeMockTest #ParmanuTestSeries #CareerGoals #teaching #education #learning #teacher #pune #punempsc #puneupsc #teachersofinstagram #school #teachers #students #teacherlife #teachersfollowteachers #english #learn #classroom #student #teach #iteach #teachersofig #love #motivation #kids #training #study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Comments
Post a Comment